drishyam 2 Team Lokshahi
मनोरंजन

अजय देवगणचा 'दृश्यम 2' ठरला हिट, केला 200 कोटींचा टप्पा पार

200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेला अजयचा तिसरा सिनेमा

Published by : Sagar Pradhan

सध्या देशभरात साऊथ चित्रपटांचा बोलबाला आहे. तर दुसरीकडे हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या 'दृश्यम 2' या सिनेमाचा समावेश आहे. हा रहस्यमय सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

'दृश्यम 2' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेले दिसुन आले. प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर 4.65 कोटींची कमाई करत 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

अजय देवगणच्या 'दृश्यम 2' सह 'ब्रह्मास्त्र', 'द कश्मीर फाइल्स', 'गंगूबाई काठियावाडी', 'भूल भुलैया 2' हे सिनेमेदेखील यावर्षात 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. आता 'दृश्यम 2' आणखी किती कमाई करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने 203.57 कोटींची कमाई केली आहे. लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता रिलीजच्या सहा महिन्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा