Ajinkya Raut Team Lokshahi
मनोरंजन

'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतने या कारणामुळे बंद केलं इन्स्टाग्राम

'मन उडू उडू झालं' या मालिकेतील इंद्रा आणि दिपाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते

Published by : shamal ghanekar

'मन उडू उडू झालं' (Mann Udu Udu Zala ) या मालिकेतील इंद्रा आणि दिपाची जोडी प्रेक्षकांना प्रंचड आवडते. या मालिकेतील इंद्रा ही भूमिका साकारणारा अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) हा सोशल मिडियावर सक्रिय असतो. फोटो आणि धमाल व्हिडिओ शेअर करत असतो. सोशल मिडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.

पण मात्र काही दिवस झाले त्यांनी सोशल मिडियावर एकही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला नाही. त्याचे कारण असे की, त्याचे इन्स्टाग्राम आकाऊट हॅक ( Ajinkya Raut Instagram hacked) झाले आहे. आता हा फटका अजिंक्य राऊत यालाही बसला आहे. अजिंक्यच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा हॅकर्सने ताबा मिळवला आहे. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा अजिंक्यने त्याचे पेज डिअक्टीव्ह केलं. या संबंधची माहिती मिळाली आहे. सध्या तरी त्याने त्याचे इन्स्टा अंकाऊट बंद केले आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांचे इन्स्टाग्राम आकाऊंट हॅक झाले आहेत.

'मन उडू उडू झालं' या मालिकेतील इंद्रजित साळगावकर म्हणजेच अजिंक्य राऊत हा घराघरात पोहोचला आहे. या मालिकेत अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा