मनोरंजन

शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल; अभिनेत्री आहे तरी कोण ?

Published by : left

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू व उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) यांचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोसोबत या अभिनेत्रीचा आणि जय पवार (Jay Pawar) याचा संबंध काय असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे नेमकी ही अभिनेत्री कोण आहे याविषयी जाणून घेऊयात…

जय पवार यांचा बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा फोटो सध्या व्हायरल होतोय. ही बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आहे. उर्वशीसोबतच्या जय यांच्या एका फोटोने सध्या सोशल मीडिया व्यापून टाकलाय. या फोटोत तिच्या शेजारी जय आणि उर्वशीचा कॉमन मित्र आणि या मित्राच्या शेजारी जय उभे आहेत. उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो 'cine riser official' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दरम्यान या फोटोवरून बातम्य़ा झाल्यानंतर हा फोटो काढून टाकण्यात आला आहे.

बॉलिवूडमधली अभिनेत्री उर्वशी रौतेलाने हेट लव्ह स्टोरी 4, सनम रे, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, पागलपंती, साईझ झिरो, मिस मॅच इंडिया, अंबरसरिया, ब्लॅक रोज, भाग जॉनी या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा