Akshay & Pareeniti Team Lokshahi
मनोरंजन

अक्षय अन परिणीती पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र....

अक्षय आणि परिणीतीची ही जोडी 2019 मध्ये 'केसरी' या चित्रपटात पाहायला मिळाली होती.

Published by : Team Lokshahi

नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचे लंडन आणि यॉर्कशायर येथील काही फोटोज लीक झाले होते. सोशल मीडियावर या फोटोंबद्दल खूप बोलबाला झाला होता. अक्षय सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु याशी संबंधित एका सूत्राने पुष्टी केली आहे की अक्षय आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

या शीर्षक नसलेल्या चित्रपटात अक्षयसोबत परिणिती चोप्राला कास्ट केलेलं आहे. स्वतः परिणीती चोप्रा हिने स्वतः याबद्दल माहिती दिली. 'आम्ही परतलो' अशी पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर याबद्दल पुष्टी केली आहे. अक्षय आणि परिणीतीची ही जोडी 2019 मध्ये 'केसरी' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. आता हे कपल पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्याच्या तयारीत आहे.

चित्रपटाच्या कथानकबद्दल बोलायचं झालं तर मुख्य खाण अभियंता जसवंत गिल यांच्यावर आधारित चित्रपटाचं कथानक आहे. ज्यांनी कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांचे प्राण वाचवले होते. अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांना बऱ्याच कालावधी नंतर एकत्र पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील. या चित्रपटातील अक्षयचा लूक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर