Bigg Boss Marathi 4 Winner Akshay Kelkar 
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4 Finale : अक्षय केळकर ठरला मराठी बिग बॉस 4 चा विजेता

गेल्या तीन महिन्यापासून घराघरात गाजत असलेल्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोची आज अखेर सांगता झाली. या भागाचा अक्षय केळकर विजेता ठरला आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर ठरला आहे. विजेतेपदासह अक्षयने घरातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा पुरस्कारही जिंकला आहे, ज्यासाठी त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. अक्षय केळकरने 15,55,000 रुपयांची बक्षीस रक्कम आणि सोन्याचे ब्रेसलेटसह बिग बॉस मराठी ट्रॉफी जिंकली आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झालेल्या बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता ठरला आहे. 3 महिने सुरू असलेल्या या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये अपूर्व नेमलेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने यांच्यात शेवटचा सामना झाला. या स्पर्धेत शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी प्रसिद्ध हिंदी टीव्ही मालिका भाकरवाडी आणि नीमा देगजोंपा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अक्षय केळकरला विजेते म्हणून घोषित केले. अक्षय केळकरचे ट्रॉफीसोबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

महाअंतिम फेरीत अपूर्व नेमलेकर आणि अक्षय केळकर हे टॉप 2 स्पर्धक होते. महेश मांजरेकर यांनी दोघांनाही मंचावर बोलावल्यानंतर या बिग बॉस स्पर्धेची उत्कंठा आणखी वाढली. यापूर्वी महेश मांजरेकर यांनीही अक्षयला 'बेस्ट कॅप्टन' म्हणून 5 लाखांचा धनादेश दिला होता. अपूर्वाचा पराभव करून, अक्षयने बिग बॉस मराठी सीझन 4 ची ट्रॉफी जिंकली.

अक्षय केळकर कोण आहे?

अक्षयने 2013 साली 'बे दुने दहा' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'कमला' मालिकेत त्याने साकारलेली उदय देशपांडेची भूमिका प्रचंड गाजली. अक्षयने 'प्रेमसाथी' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अवधूत गुप्तेच्या 'कान्हा' या सिनेमात त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. 'कॉलेज कॅफे' या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता. सब टीव्हीच्या 'भाखरवडी' या हिंदी मालिकेतदेखील त्याने काम केलं आहे. 

विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर अक्षयने एक खास पोस्ट लिहिली आहे. चाहत्यांचे आभार मानत त्याने लिहिलं आहे,"हे फक्त आणि फक्त तुम्हा प्रेक्षकांमुळे होऊ शकलय! खूप खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार! मी खऱ्या अर्थाने तुमचाच झालोय!". अक्षयच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा