Akshay Kumar Team Lokshahi
मनोरंजन

Akshay Kumar : राजकीय वाटचालीबद्दल अक्षयने केला 'हा' खुलासा...

अक्षयला प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं की मी चित्रपट करण्यातच खूप आनंदी आहे.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड (Bollywood) स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याने राजकारणात येण्याच्या प्लॅनवर नुकतेच आपले मत व्यक्त केले आहे. लंडनच्या एका मॉलमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदुजा आणि बॉलीवूडच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अक्षय बोलत होता. प्रश्न विचारला असता त्याने राजकारणात सहभागी होण्यास नकार दिला आणि म्हटलं की मी चित्रपट करण्यातच खूप आनंदी आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमात राजकारणात सामील होण्याबाबत विचारले असता अक्षय म्हणाला की तो सिनेमाद्वारे त्याच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणाला चित्रपट बनवताना जो आनंद मला मिळतो तो इतर कुठल्याही बाबतीत मला मिळणार नाही... एक अभिनेता म्हणून मी सामाजिक प्रश्न मांडण्याचा नेहमी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. मी 150 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट म्हणजे रक्षाबंधन. मी एका वर्षात तीन-चार चित्रपटांची निर्मिती करतो. या चित्रपटात भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सहजीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृती श्रीकांत ही स्टार मंडळी रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहेत. नुसरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्यासोबतचा राज मेहता यांचा सेल्फीही त्याच्याकडे आहे.

जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरतसोबत अक्षय अभिषेक शर्माच्या राम सेतूमध्येही दिसणार आहे. अक्षयने 1991 मध्ये 'सौगंध' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु त्याला पहिले व्यावसायिक यश अ‍ॅक्शन थ्रिलर खिलाडी (1992) द्वारे मिळाले होते. ज्यामुळे खिलाडी चित्रपट ही मालिका बनली. तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या सम्राट पृथ्वीराज या ऐतिहासिक नाटकात तो शेवटी पहायला मिळाला. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटात मानुषी छिल्लर, संजय दत्त, सोनू सूद, मानव विज, आशुतोष राणा आणि साक्षी तन्वर यांच्याही भूमिका आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा