Akshay Kumar Team Lokshahi
मनोरंजन

Akshay Kumar : चित्रपटासाठी अक्षय घेतो 'एवढं' मानधन...

अक्षयची एकूण संपत्ती 2050 कोटी रुपये आहे

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून नामांकित असणारा अभिनेता सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या आपल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटामुळे बहुचर्चित आहे. या चित्रपटात सम्राट पृथ्वीराजची दमदार भूमिका साकारून अक्षयने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच पसंती मिळवली आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुकही अधिक प्रमाणात होत आहे. अक्षय सध्या काही नामांकित अभिनेत्यांपैकी सर्वात यशस्वी स्टार्समध्ये एक आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू 140 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1066 कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षय प्रत्येक जाहिरातीसाठी 6 किंवा 7 कोटी रुपये प्रमाणे फिस घेतो. दरवर्षी 4-5 चित्रपटांमध्ये काम करणारा अक्षय कुमार हा इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. अक्षय प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 100 कोटी रुपये फिस घेतो.

अक्षय वर्ल्ड कबड्डी लीग संघ खालसा वॉरियर्सचा मालक आहे. त्याने यामध्ये स्वतः 300 कोटींची रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसनाऱ्या अक्षयची एकूण संपत्ती 2050 कोटी रुपये आहे. तर अक्षयकडे 11 लक्झरी वाहने आणि बाईक देखील आहेत.

त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याचा आगामी 'सेल्फी' या चित्रपटासह इतर काही मोठ्या चित्रपटांमध्ये देखील तो दिसणार आहे. अक्षयच्या 'अतरंगी रे' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला जम बसवता आला नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा