Akshay Kumar, Ajay Devgan, Shah Rukh Khan  Team Lokshahi
मनोरंजन

तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातीबद्दल अक्षय कुमारने मागितली माफी

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारची विमल इलायची जाहिरात चर्चेत

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला (Akshay Kumar) तुम्ही विमल इलायचीच्या जाहिरातीत (advertisement of Vimal Ilaichi) पाहिलं असेल. या जाहिरातीत शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अजय देवगणसोबत (Ajay Devgan) खिलाडी कुमार दिसत आहे. या जाहिरातीसाठी अक्षय कुमार सोशल मीडियावर खुप ट्रोल (Troll) झाला. लोकांच्या या ट्रोलिंग नंतर आता अक्षय कुमारने एक मोठी घोषणा केली आहे.

अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांची माफी मागत सांगितले की आता तो तंबाखू ब्रँड (विमल) चे ब्रँड अॅम्बेसेडर (Brad Ambassador) राहणार नाही . अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या निर्णयाबद्दल सांगितले आहे.

अक्षय कुमारने इंन्टा पोस्टवर लिहीले- मला माफ करा. मला माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागायची आहे. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियांनी मला खूप प्रभावित केले आहे. मी तंबाखूला कधीही मान्यता दिली नाही आणि करणारही नाही. विमल इलायची यांच्याशी असलेल्या माझ्या एसोसिएशन बद्दल आलेल्या तुमच्या भावनांचा मी आदर करतो. म्हणूनच मी नम्रतेने यातून माघार घेत आहे.

मी निर्णय घेतला आहे की या जाहिरातीसाठी मिळालेल्या फीसचा वापर चांगल्या कामा साठी करेन. ब्रँडची इच्छा असल्यास त्याच्या कायदेशीर कालावधी पूर्ण होईपर्यंत ही जाहिरात प्रसारित करणे सुरू ठेवू शकतो. पण मी वचन देतो की भविष्यात मी हुशारीने पर्याय निवडेन. त्या बदल्यात, मी नेहमीच तुमचे प्रेम आणि प्रार्थना मागत राहीन."

काही दिवसापूर्वी अक्षय कुमारची एक जाहिरात रिलीज झाली. ज्यामध्ये अजय देवगन आणि शाहरुख खान 'विमल युनिव्हर्स' मध्ये अक्षय कुमारचे स्वागत करतात. बॉलिवूडचे तीन स्टार (शाहरुख खान, अजय देवगन, अक्षय कुमार) पहिल्यादांच एका जाहिरातीत एकत्र आले होते. पण तिन्ही मोठे स्टार तंबाकू ब्रॅडसाठी एकत्र आले होते. यामुळे ही जाहिरात ट्रोल झाली आहे. अजय देवगण यापूर्वीही अनेक तंबाखू ब्रँडच्या एड्समध्ये दिसला आहे. शाहरुख खानने अशी जाहिरात केल्याने फारसा गोंधळ झाला नाही. मात्र खिलाडी कुमार दिसताच लोकांनी गोंधळ घातल्याच दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा