फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने घेतली. या मुलाखतीत अभिनेता अक्षय कुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "संत्री कशी खायची ते राजकारणतला हिरो कोण आणि पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तर, सीन कोणता असेल" असे अनेक मजेदार प्रश्न केले.
यावर देवेंद्र फडणवीसांनी देखील तितकेच मजेदार उत्तर दिली. तसेच अक्षय कुमारने राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर देखील नजर पाडली आहे. अशातच अक्षय कुमारने पोलिस दलाशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला.
ज्यात अक्षय कुमारने म्हटलं होत की, "महाराष्ट्र पोलीस जे बूट वापरतात, त्यात टाचा असल्यामुळे पोलिसांना धावताना त्यांच्या बूटांमुळे त्यांना अडचणी निर्माण होतात. त्यांचे बूट बदलले, तर त्याचा पोलिसांना उपयोग होईल. ते अधिक धावू शकतील." असं म्हणत अक्षय कुमारने फडणवीसांकडे महाराष्ट्र पोलीस वापरत असलेल्या बूटांमध्ये बदल करावे अशी मागणी केली.
यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, "तुम्ही आता जी गोष्ट मांडली ती अतिशय योग्य आहे. ही गोष्ट आतापर्यंत कोणीच माझ्यासमोर मांडली नाही. फडणवीस अक्षय कुमारला म्हणाले की, तुम्ही काही डिझाईन किंवा इनोव्हेशन सांगितलं, तर आपण पोलिसांच्या बूटांमध्ये तसे काही बदल करु. "
अक्षय कुमारने मांडलेल्या या मागणीवर महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या बुटांमध्ये अत्याधुनिक आणि आरामदायी बदल होतील ज्यामुळे त्यांना वेगाने धावणे शक्य होईल.