Akshay & Aamir Team Lokshahi
मनोरंजन

Akshay & Aamir : अक्षय अन् आमिरची पुन्हा टक्कर ?

चित्रपटाबद्दल बोलत असताना अक्षयने केला खुलासा....

Published by : prashantpawar1

अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी मागील वर्षी रक्षाबंधन या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून अक्षयच्या शूटिंगदरम्यानचे अनेक वेळा सेटवरील फोटो समोर आले आहेत. आता अक्षयने रक्षाबंधनाची रिलीज डेट जाहीर केली आहे. अक्षयने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की या खास दिवशी आम्ही भावनांसह परतलो. 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन. या व्हिडिओसोबत अक्षयने लिहिले की 'तुमच्यासमोर सर्वात पवित्र नात्याचं चित्रपटात दर्शन करून देणार आहे जे तुम्हाला तुमच्या बंधनाची आठवण करून देईल. 11 ऑगस्ट 2022 रोजी 'रक्षाबंधन' हा चित्रपट रिलीज होत आहे. आनंद एल राय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या 'अतरंगी रे' या चित्रपटातही अक्षयने आनंदसोबत काम केले होते. रक्षाबंधन या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर अक्षयसोबत भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही देखील मुख्य भूमिकेत आहे. याआधी हे दोघे टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटात दिसले होते. जेव्हा अक्षयने चित्रपटाची घोषणा केली तेव्हा अक्षयने हा चित्रपट आपल्या बहिणीला समर्पित केला. अक्षय म्हणाला की, माझ्या बहिणीसोबत वाढलेली अलका माझी बहीण माझी पहिली बेस्ट फ्रेंड होती जी फार गोड होती. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट त्याच दिवशी प्रदर्शित होत आहे ज्या दिवशी आमिर खान (Aamir Khan) यांचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' प्रदर्शित होत आहे. यापैकी एकाही स्टारच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली नाही. या रक्षाबंधनाला आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यापूर्वी कोविडमुळे 'लाल सिंह चड्ढा'च्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा