Alia & Ranbir Team Lokshahi
मनोरंजन

Alia Bhatt : पतीच्या चित्रपटासाठी आलिया बनली प्रोड्युसर....

आलिया आपल्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं रणबीरने सांगितलय.

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने त्याचा आगामी चित्रपट 'शमशेरा'च्या प्रमोशन दरम्यान एक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत रणबीरने असं सांगितलं की त्याला त्याचा एक चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे. यासाठी त्याने लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान एक कथानक देखील लिहिलेलं आहे. तसच आलिया भट्ट (Alia Bhatt) या चित्रपटाची निर्मिती करू शकते असही त्याने सांगितलय. रणबीर म्हणाला की, मी अनुराग बासू (Anurag Basu) सोबत 'जग्गा जासूस' या चित्रपटाची निर्मिती केली त्याक्षणी मला कुठलाही अनुभव नव्हता.

मी एक अभिनेता म्हणून तो चित्रपट केलेला आहे. त्यामुळे मी आजवर निर्माता म्हणून काम केलेलं नव्हतं. मला नेहमीच चित्रपट दिग्दर्शित (Directer) करण्याची इच्छा व्हायची. संभाषणादरम्यान रणबीर पुढे म्हणाला की या लॉकडाऊनमध्ये मी एक कथानक लिहिलेलं आहे. मला ती कथा खूप आवडली पण ती कशी लिहायची हे मला माहित नव्हतं. त्यामुळे मी माझी कथा ज्यांना शेअर करेन त्यांच्यासोबतच मी तो चित्रपट बनवणार आहे. निर्मितीतून मला आणखी दिग्दर्शन करायचे आहे. माझी पत्नी खूप चांगली निर्माती आहे त्यामुळे कदाचित ती माझ्या चित्रपटाची निर्मिती करू शकते.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी नुकतच सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. या जोडप्याचा विवाह यावर्षी 14 एप्रिल रोजी कुटुंब आणि मित्रांसमवेत झाला होता. अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. रणबीरच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये लव रंजनचा अनटाइटल्ड रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये तो श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. यासोबतच करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित 'शमशेरा' या 22 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातही रणबीर मुख्य भूमिकेत आहे. यात रणबीरसोबत वाणी कपूर(Wani Kapoor) आणि संजय दत्त(Sanjay Datt) यांची देखील महत्वाची भूमिका आहे. याशिवाय रणबीर आणि रश्मिका मंदान्ना(Rashmika Mandana) यांचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपटही सध्या खूप चर्चित आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट