मनोरंजन

आलिया भट्ट बनली बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री, मौल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल

Published by : Team Lokshahi

2021 ची सेलिब्रिटी ब्रँड (Celebrity brands) मूल्यांकन (Celebrity brand evaluation) अहवाल आला आहे. या रिपोर्टनुसार डफ अँड फेल्प्सने व्हॅल्यू (Duff and Phelps value) सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रणवीर सिंग (Ranveer Singh), आलिया भट्ट , अक्षय कुमार आणि दिपीका पादुकोण (Deepika Padukone) सारखे इंडियन सेलेब्स (Indian celebs) आहेत.

ही यादी डफ आणि फेल्प्सने 'डिजिटल एक्सलेरेशन (Phelps' Digital Acceleration) 2.0′ या शीर्षकाच्या 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन स्टडी, 2021' च्या 7 व्या आवृत्तीत प्रसिद्ध केली आहे. रिपोर्टनुसार, आलिया भट्ट (Alia Bhatt) ही 2021 सालातील सर्वात महागडी सेलिब्रिटी (Expensive celebrities) आहे. त्याचे मूल्य अंदाजे 68.1 दशलक्ष आहे.

डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन नुसार, आलिया भट्ट 2021 मध्ये सर्वात महागडी महिला सेलिब्रिटी म्हणून आली. $68.1 दशलक्ष मुल्यांकनासह, आलिया भट्ट चौथ्या क्रमांकावर आहे आणि भारतीय अभिनेत्री श्रेणीत अव्वल आहे. मागील यादीच्या तुलनेत आलियाने दोन क्रमांकांची वाढ केली आहे. आलिया ही बॉलिवूडची सर्वात व्यस्त अभिनेत्री आहे आणि अनेक ब्रँड एंडोर्समेंटमुळे (brand endorsement) ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.

रणवीर सिंग हा टॉप रेटेड अभिनेता बनला आहे. या यादीत विराट कोहली (Virat Kohli) १८५.७ दशलक्ष डॉलर्सच्या इक्विटीसह अव्वल स्थानावर आहे. तर रणवीर सिंग (रणवीर सिंग ब्रँड व्हॅल्युएशन) $१५८.७ दशलक्षसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटचे मूल्यांकन आधीच्या यादीपेक्षा कमी असले तरी. रणवीर सिंगची एक रँक वाढली आहे. अक्षय कुमारचे (Akshay Kumar) मूल्यांकन कमी झाले असुन तो १३९.६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली