Alia Bhatt On Trollers team lokshahi
मनोरंजन

Alia Bhatt On Trollers : आलिया भट्टचं बोल्ड वक्तव्य चर्चेत

महिलांबाबत आलिया भट्टचं बोल्ड वक्तव्य चर्चेत

Published by : Team Lokshahi

Alia Bhatt On Trollers : एक दशकापूर्वी करण जोहर दिग्दर्शित स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण करणारी बॉलीवूड स्टार आलिया भट्ट आता देशातील आघाडीच्या स्टार्सपैकी एक आहे. राझी, हायवे, गली बॉय, उडता पंजाब आणि अगदी अलीकडचा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी यासारख्या अनेक प्रशंसनीय चित्रपटांसह आलियाने स्वतःला एक चांगली अभिनेत्री म्हणून स्थापित केले आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांची आवडती, आलिया भट्ट आगामी नेटफ्लिक्ससह, डार्लिंग्ज निर्माती म्हणून पदार्पण करत आहे. (alia bhatt got angry on sexism comments)

आलिया चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्या बद्दल आपले मत व्यक्त केले. महिलांना कसे जगावे याचे सल्ले दिले जातात हे त्यांनी सांगितले. समाजात महिलांना कसे चुकीच्या गोष्टींना सामोरे जावे लागते आणि इंडस्ट्रीतही लैंगिकतेला ही. तुझी मासिक पाळी सुरू आहेत का? तेव्हा मी त्यांना सांगते मी सेंसिटिव्ह नाही किंवा इतरांपेक्षा वेगळी नाही आणि तुम्ही जेव्हा मासिक पाळीबद्दल बोलता तेव्हा लक्षात घ्यायला हवं की स्त्रियांना मासिक पाळी येते त्यामुळेच माणसाचा जन्मही होतो

आलियाने सांगितले की, जेव्हा महिलांना त्यांच्या ब्रा लपवण्यास सांगितले जाते तेव्हा तिला खूप राग येतो. अभिनेत्री म्हणाली ब्रा का लपवायची, तेही कापड आहे. परंतु पुरुषांना त्यांचे अंतर्वस्त्र लपवण्यास सांगितले जात नाही. अभिनेत्री म्हणाली की, मला अनेकदा आक्षेपार्ह कॉमेंट्रीचा सामना करावा लागला आहे. तरीही मी त्याकडे लक्ष दिले नाही. पण मी आता या सगळ्याचा खूप विचार करते कारण मला या समस्येची जाणीव आहे. कधी-कधी माझे मित्रही मला सांगतात की इतके संवेदनशील होऊ नकोस.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला