मनोरंजन

आलिया भट्टने एकाच आठवड्यात केले दोनदा लग्न; करण जोहरने केला धक्कादायक खुलासा

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि प्रशंसा मिळाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि प्रशंसा मिळाली आहे. अलीकडेच, करणने त्याच्या चित्रपटाची सक्सेस पार्टी साजरी केली आणि चित्रपटाच्या कुडमयी गाण्याचे संपूर्ण व्हर्जन लाँच केले. चित्रपटातील कुडमयी हे गाणे रॉकी आणि राणी यांच्या प्रेमकथेचा हॅप्पी एंडीग करते. त्यांचे लग्न शेवटी गाण्यात दाखवले आहे.

कुडमयी या गाण्याबद्दल सांगताना करण जोहर म्हणाला की, मेकिंग दरम्यान आलियाने आठवड्यातून दोनदा लग्न केले. आलियाने रणबीर कपूरसोबत लग्नाच्या चार दिवसांनंतर हे गाणे शूट केले आहे. राणीच्या हातावरची मेहंदी ही आलियाच्या लग्नातील मेहंदी होती. शूटसाठी तिने मेंहदीचा रंग फक्त गडद केला आहे. म्हणजे रॉकी आणि राणीच्या लग्नाचा हा सीन आलियाच्या लग्नानंतर काही दिवसांनी शूट करण्यात आला होता. तसेच, करणने चित्रपटात पूर्ण गाणे समाविष्ट करण्याची योजना आखली होती. परंतु, ते रनटाइमच्या पलीकडे जात होते. त्यामुळेच क्रेडीटमध्ये कुडमाईचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी घेऊन करण जोहर 7 वर्षांनी दिग्दर्शक म्हणून परतला. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट तसेच धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत आणि प्रेक्षकांकडून तसेच सेलिब्रिटींकडूनही या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा टप्पा ओलांडला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच