मनोरंजन

Alia Bhatt - Ranbir kapoor : रणवीर-आलियाला होणार जुळी मुलं? प्रमोशनवेळी रणबीर म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. लवकरच त्यांच्याकडे गुडन्यूज असून ते आई - बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर रणबीर कपूरने एक वक्तव्य केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. लवकरच त्यांच्याकडे गुडन्यूज असून ते आई - बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर रणबीर कपूरने एक वक्तव्य केलं आहे.

‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी रणबीरने या विषयावर भाष्य केलं. एका मुलाखतीत रणबीर म्हणाला की, ‘मला जुळी मुलं होणार आहेत, त्यानंतर तो असेही म्हणाला मी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग बनणार आहे, मी कामातून बराच ब्रेक घेत आहे.’ या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना जुळी मुलं होतील असे बोलण्यास सुरुवात केली आहे.

रणबीर आणि आलियाने यावर्षी 14 एप्रिल रोजी कुटुंबीय आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नापूर्वी दोघेही 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वी आलियाने सोशल मीडियावर हॉस्पिटलचा एक फोटो शेअर करून लिहिले होते, ‘आमचे बाळ… लवकरच येत आहे’असे लिहिले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज