मनोरंजन

पती रणबीर कपूरला नाही तर 'या' कलाकाराला आलियाने सर्वात आधी दिली प्रेग्नेंसीची गुड न्यूज

आलिया भट्ट हिंदी चित्रपटसृष्टीतील ती अभिनेत्री आहे जी तिच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

Published by : shweta walge

आलिया भट्ट हिंदी चित्रपटसृष्टीतील ती अभिनेत्री आहे जी तिच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच आलियाने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाद्वारे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. गेल्या वर्षी रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर आलियाने 6 नोव्हेंबरला मुलगी राहा हिला जन्म दिला, पण तुम्हाला माहित आहे का की आलियाने तिच्या प्रेग्नेंसीची गुड न्यूज सर्वप्रथम कोणाला दिली होती.

जेव्हा आलिया भट्टला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहित पडलं तेव्हा ती 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. सुरुवातीच्या दिवसांपर्यंत तिने याबाबत कोणालाही सांगितलं नाही, मात्र नंतर आलियाने तिची को-स्टार वंडर वुमन फेम गाल गडॉटला याबाबत माहिती दिली. रिपोर्ट्सनुसार, आलिया म्हणाली- “पहिल्या तीन महिन्यांपर्यत प्रेग्नेंसीबद्दल कोणालाही सांगायचं नसतं, पण मी गॅल गॅडोटवर विश्वास ठेवला.

जेव्हा मी गॅडोटला गरोदरपणाची बातमी दिली तेव्हा ती खूप उत्साही आणि आनंदी झाली, त्यानंतर तिने सेटवर माझी काळजी घेतली, याशिवाय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक टॉम हार्पर यांनाही माझ्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती असणे आवश्यक होते. सर्वांनी मला खूप चांगला पाठिंबा दिला आणि त्यामुळे मला खूप आराम वाटलं.

दरम्यान, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धूमाकूळ घालत आहे. यापूर्वी आलियाचे 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा