tunisha sharma Sheezan Khan Team Lokshahi
मनोरंजन

टुनिशा शर्माच्या मृत्यूप्रकरणी अलीबाबाचा मुख्य अभिनेत्याला अटक

अभिनेत्री टुनिशा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केली आहे. यामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. टुनिशाच्या आईने तिच्या सहकलाकारविरुध्द पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचा सहकलाकार मोहम्मद शिझान अटक केली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवताना अभिनेत्रीचा सहकलाकार मोहम्मद शिझान याला अटक करण्यात आली आहे. कलम 306 अंतर्गत नोंदणीकृत आहे. याशिवाय, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. तर आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, अशी माहिती वालीव पोलिसांनी दिली. खून आणि आत्महत्या या दोन्ही आधारे मृत्यूचा तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दुसरीकडे, टुनिशा आणि शिझान एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्याने प्रेमसंबंध तोडल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती, अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती.

दरम्यान, एका मालिकेचे शुटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने जीवन संपवलंय. नायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली आहे. सध्या तुनिशा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा