Allu Arjun Team Lokshahi
मनोरंजन

Allu Arjun : कुटुंबियांसह अल्लू अर्जुनचा फोटो होतोय व्हायरल, कारण...

अल्लू अर्जुन आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद घेत आहे.

Published by : prashantpawar1

साउथ चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आपल्या शानदार अभिनयाने संपूर्ण भारताचा स्टार बनला आहे. चाहते त्याच्या चित्रपटांची नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. जुलैपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अल्लू अर्जुन आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याची पत्नी स्नेहा रेड्डी (Sneha Reddy) हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या व्हेकेशनचा फोटो शेअर केला आहे. अल्लू अर्जुन सध्या टांझानियामध्ये आपल्या कुटुंबियांसह सुट्टी साजरी करत आहे. गेल्या एक आठवड्यापासून ते पत्नी स्नेहा रेड्डी आणि मुलासह तेथे उपस्थित होते.

स्नेहा रेड्डीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोमध्ये अल्लू अर्जुन कुटुंबियांसमवेत सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये दिसत आहे. अल्लूसोबत त्याची मुलं आणि पत्नी दोघांनीही पांढरा पोशाख कॅरी केला आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुन पत्नी स्नेहा रेड्डीच्या बाजूला दिसत आहे. या फोटोत दोन्ही मुलही खूप क्यूट दिसत आहेत. अल्लू अर्जुन या फोटोत वाढलेली दाढी आणि मोठे केस असलेला दिसत आहे. हे पाहून हा लूक त्याच्या आगामी 'पुष्पा: द रुल' या चित्रपटातील असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अल्लू अर्जुन 'पुष्पा'च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'पुष्पा : द राइज'च्या अफाट यशानंतर प्रेक्षकांना 'पुष्पा : द रुल'कडून खूप अपेक्षा आहेत. पुढील वर्षी 2023 च्या मध्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा