नॅशनल अवॉर्ड विजेते अल्लू अर्जुन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत. त्यांच्या करिष्माई व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार ऑन-स्क्रीन उपस्थितीमुळे ते देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया आयकॉन म्हणून त्यांना प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम, सन्मान आणि कौतुक मिळत आहे.
लार्जर-दॅन-लाईफ स्टारडम असतानाच अल्लू अर्जुन हे एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व देखील आहेत. कुटुंबासोबत घालवलेले क्षण ते नेहमीच खास मानतात. याचा सुंदर प्रत्यय नुकताच आला, जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना आणि ज्येष्ठ निर्माते अल्लू अरविंद यांच्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय भावूक संदेश शेअर केला. सोशल मीडियावर वडिलांसोबतचा एक प्रेमळ फोटो शेअर करत अल्लू अर्जुन यांनी लिहिले, “हॅप्पी बर्थडे, डॅड. माझ्या आयुष्यात देवाच्या सर्वात जवळ कोणी असेल, तर ते तुम्ही आहात. तुम्ही नेहमी आनंदी आणि निरोगी आयुष्य जगो.
याशिवाय, अल्लू अर्जुन यांनी जागतिक बॉक्स ऑफिसवर १८०० कोटी रुपयांचा लाइफटाइम कलेक्शनचा टप्पा गाठत कलेक्शन चार्टवर आपले वर्चस्व कायम राखले आहे, जो आतापर्यंतचा एक ऐतिहासिक विक्रम मानला जात आहे. या ब्लॉकबस्टर यशाच्या जवळ कोणती फिल्म पोहोचू शकेल का, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, अल्लू अर्जुन यांच्या आगामी प्रोजेक्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. आयकॉन स्टार पुढे जे काही मोठ्या पडद्यावर घेऊन येतील, ते भव्य, दमदार आणि ऐतिहासिकच असणार आहे.