मनोरंजन

मुंबईत अल्लू अर्जुनने चक्क मराठीत साधला संवाद, म्हणाला…

Published by : Lokshahi News

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते गर्दी करताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतंच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधला. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे .

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना याचा पुष्पा हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुंबईत एका प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अल्लू अर्जुन, रश्मिका मंदनासह इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधला .यावेळी अल्लू अर्जुन जेव्हा उपस्थितांशी संवाद साधायला उठला तेव्हा तो म्हणाला, 'सगळ्यांना माझा नमस्कार…' याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Watch Bollywood नावाच्या एका युट्यूब चॅनलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

'सुपरस्टार' अल्लु अर्जुन याचा 'पुष्पा' चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. आंध्र प्रदेशमधल्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातील पात्र आणि कथा पूर्ण करण्यासाठी आणि रंगवण्यासाठी आणखी कालावधीची गरज असल्याने हा चित्रपट दोन वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज केला जाणार आहे, असे निर्माते नवीन येर्नेनी यांनी सांगितले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावळं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका