Admin
मनोरंजन

Pushpa The Rule Poster : अल्लू अर्जुनने नेसली साडी, कानात झुमका, गळ्यात लिंबाची माळ 'पुष्पा'चा खतरनाक लूक आला समोर

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार्स त्यांच्या नवीन चित्रपट पुष्पा: द रुलमध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार्स त्यांच्या नवीन चित्रपट पुष्पा: द रुलमध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अल्लू अर्जुनने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याने पुष्पा 2 चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये तो अतिशय खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा लूक चर्चेचा विषय बनला आहे.

अल्लू अर्जुनने चाहत्यांना त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'पुष्पा: द रुल'च्या पोस्टरची झलक दाखवली आहे, ज्यामध्ये त्याचा लूक घाबरवणारा आहे. अल्लू अर्जुन दक्षिण भारतीय साडीत दिसत असल्याचे पोस्टरमध्ये दिसत आहे. त्यांच्या गळ्यात लिंबाची माळ आहे. अभिनेत्याने बांगड्या, अंगठी आणि अनेक हार घातलेला आहे. अल्लूने कमरेला कमरपट्टा देखील लावला आहे.

पोस्टरमधील अल्लू अर्जुनच्या मेकअपनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कपाळावर एक ठिपका आहे, जो शिवाच्या तिसऱ्या डोळ्यासारखा दिसतो. हातात बंदूक घेतलेल्या अल्लू अर्जुनचा हा लूक खूपच भीतीदायक आहे. 'पुष्पा: द रुल'चे हे पोस्टर पाहून चाहते वेडे झाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर मेकर्सनी 'पुष्पा 2' चा व्हिडिओ देखील रिलीज केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Kenekar : खुलताबादचं नाव 'रत्नापूर' करण्याची मागणी ; भाजप आमदार संजय केणेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Pravin Gaikwad : चंद्रशेखर बावनकुळे दीपक काटेचे गॉडफादर असल्याचा आरोप

Latest Marathi News Update live : आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया