मनोरंजन

“पहन्ने, को दिया पजामा, लगा साड़ी को फाड़ा"; बिग बींचा हटके लूक

बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ते सोशल मिडियावर जास्तच सक्रिय असतात. त्यांचे फोटो, व्हिडिओ ते सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.

Published by : Siddhi Naringrekar

बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ते सोशल मिडियावर जास्तच सक्रिय असतात. त्यांचे फोटो, व्हिडिओ ते सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. सध्या बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी स्वत:च्याच लूकवर चारोळी लिहित विनोद केलाय.

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan ) यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरील दोन फोटो ट्वीटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिग बींनी पांढऱ्या रंगाचं हुडी त्यावर निळा स्कार्फ आणि रंगीत हेरम पॅन्ट घातली आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत “पहन्ने, को दिया पजामा, लगा साड़ी को फाड़ा ;आगे छोटी जेब दे दी, औ’ पीछे लगा है नाड़ा !!” असे त्यांनी लिहिले आहे.

यावर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘नवे रणवीर सिंग’ म्हंटलं आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, “अरे सर हा रणवीर सिंगचा आजार कुठून झाला.” तर दुसरा युजर म्हणाला, “रणवीर भावा जरा सांभाळून रहा फॅशनमध्ये आता बीग बी देखील टक्कर देत आहेत.” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा