बॉलिवूडमधील सेलिब्रिटी व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या खाजगी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा आपल्याला सोशल मीडियाद्वारे माहिती मिळत असते. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात सक्रिय असलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे ते सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधतात.
अमिताभ बच्चन यांची एक ट्वीटरची पोस्ट सोशल-मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, 'आता जाण्याची वेळ आली आहे.' या पोस्टने चाहत्यांना काळजीत टाकलं आहे. मागील काही महिन्यापासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटामुळे बच्चन कुंटुब चांगलेच चर्चेत होते. या चर्चेदरम्यान बच्चन कुटुंबाचे अनेक फोटो, व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते. 2011 सालचा अमिताभ बच्चन यांचा एका मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संपत्तीविषयी भाष्य केले आहे. या मुलाखतीमध्ये म्हणाले की, "जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा माझ्या संपत्तीचे दोन्ही मुलांमध्ये समान भाग होतील याच्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. जया बच्चन आणि मी हे पुर्वीच ठरवलं होतं." असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.
अमिताभ बच्चन यांनी मुलीला संपत्तीमध्ये दिला समान हक्क
"मुलगी हे दुसऱ्यांच धन मानलं जात. तिच लग्न करुन दिले की वडीलांच्या संपत्तीवर तिचा काहीच हक्क राहत नाही. पण माझ्या दृष्टीने हे चुकीचे आहे. ती माझी मुलगी आहे. त्यामुळे अभिषेकसोबतच श्वेताचादेखील माझ्या संपत्तीवर समान अधिकार आहे." असे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ यांची 2024 मध्ये एकूण संपत्ती 1600 कोटीं रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. एका रिपोर्टनुसार, अमिताभ यांनी त्यांचा सुप्रसिद्ध 'जलसा' बंगला मुलीला म्हणजेच श्वेता नंदाला भेट म्हणून दिला आहे. या बंगल्याची किंमत साधारण 50 कोटी इतकी असल्याचे समोर आले आहे.