Amitabh Bachchan, Ajay Devgn Team Lokshahi
मनोरंजन

Ajay - Amitabh : अजयच्या पोस्टवर अमिताभचा निशाणा...

बॉलिवूड अभिनेते अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेते अजय देवगण (Ajay Devgan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. नुकताच दोघांचा रनवे ३४ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अजयने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'बोल बच्चन' या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अजय आणि बिग बी एकत्र दिसले होते. चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या फोटोत अजय आणि रोहित शेट्टी दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांचा उल्लेख यात नसल्यामुळे 'बिग बी' संतप्त झाले आहेत. अजयच्या पोस्टवर त्यांनी कमेंट केली आहे. अजय देवगणने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बंदूक घेऊन उभा आहे आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) कॅमेरा धरून शूटिंग करत आहे.

फोटो शेअर करताना अजयने लिहिले की दोन बोल बच्चन एकमेकांना शूट करत आहेत. 10 साल बोल बच्चन के. असं म्हटल्यावर अजयच्या या पोस्टवर कमेंट करण्यापासून अमिताभ बच्चन स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी लिहिले की फक्त गोळी मारू नका 'अरे यार तिसर्‍यालाही बोलवा.' अजय देवगणही बिग बींच्या या कमेंटला उत्तर देण्यापासून मागे हटला नाही. त्याने लिहिले की 'ओजी बच्चन यांना कोणत्याही आमंत्रणाची गरज नाही.

' बोल बच्चनबद्दल बोलायचे झाले तर हा अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन, असिन, प्राची देसाई, अर्चना पूरण सिंग आणि कृष्णा अभिषेक महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. वर्क फ्रंटवर अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर अजयकडे चित्रपटांची जास्तीच ओढ आहे. नुकतच त्याने 'भोला' या चित्रपटाची घोषणा केली असून तो लवकरच दिग्दर्शित करणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा