Amrita Rao Lokshahi
मनोरंजन

अमृताने सोडलं बॉलीवूड : अखेर सत्य आलं समोर....

चित्रपटाच्या काही सिनबद्दल अमृताने सांगितल्या काही महत्वाच्या गोष्टी....

Published by : prashantpawar1

'विवाह' आणि 'मैं हूं ना' यांसारख्या चित्रपटांमुळे चर्चित असणारी बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव(Amrita Rao) हीने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक मनावर अधिराज्य गाजवलं. लाइमलाइटपासून दूर असलेली अमृता राव सध्या आपला पूर्ण वेळ आपल्या मुलाला आणि कुटुंबीयांना देत आहे. अमृताचा उल्लेख होताच अनेकांच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण व्हायला लागते की तिने चित्रपटसृष्टीला इतक्या लवकर निरोप का दिला असावा? नुकतच अमृताने तिच्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल खुलासा केला आहे. तिच्या काही अटी होत्या ज्यामुळे चांगले चित्रपटही तिच्या हातातून निसटत होते.

तिच्या एका व्हिडिओमध्ये अमृता रावने सांगितले होते की, आदित्य चोप्राने तिला YRF ची इन-हाउस अभिनेत्री बनण्याची ऑफर दिली होती. जर अमृताने या संधीचा स्वीकार केला असता तर तिला सुरुवातीला देशातील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसकडून तीन चित्रपटांच्या ऑफर साइन कराव्या लागल्या असत्या. यादरम्यान अमृताने आदित्यसमोर अट घातली होती की ती कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन देणार नाही. यामुळे अमृता रावने आदित्यची ही ऑफर लगेच नाकारली होती. आदित्य चोप्राने तिला वचन दिले होते की तो तिच्या अटीनुसार चित्रपट बनवेल त्यावेळी तो तिच्याशी नक्कीच संपर्क करेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की याआधी अमृताने नील आणि निक्की आणि बचना ए हसीनोच्या ऑफरही नाकारल्या होत्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर