Amruta Fadnavis Team Lokshahi
मनोरंजन

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर, पाहा फोटो

रेड कार्पेटवरील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर केले शेअर

Published by : shweta walge

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) ह्या 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल' (Cannes Film Festival) मध्ये सहभागी झाल्या होत्या. तेथील रेड कार्पेटवरील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये पहिल्यांदाच सहभागी झाल्या.

कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये एका विशेष मोहिमेच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.

यावेळी अमृता यांच्यासह डॉमिनिक ओयुटारा, राजकुमारी धिदा तलाल, अभिनेता शारोन स्टोन, चार्ली चॅप्लिन यांची नात अभिनेत्री कायरा चॅप्लिन यांनीही उपस्थिती लावली होती.

याबद्दल विचारले असता अमृता फडणवीस म्हणाल्या की, अन्न आणि आरोग्य याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी बेटर वर्ल्ड फंडने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी कान्समध्ये उपस्थिती लावली होती.

सेशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अमृता यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे. अनेकदा त्या राजकीय ट्वीट करत आपलं मतंही मांडतात. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अमृता फडणवीस यांच्या रेड कार्पेटवरील हजेरीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर