Amruta Khanvilkar  Team Lokshahi
मनोरंजन

Video; अमृता खानविलकरचा मेट्रोतला डान्स पाहिलात का ?

Published by : Akash Kukade

सध्या सगळीकडे 'चंद्रमुखी' (Chandramukhi) सिनेमाची चर्चा सुरू आहे. या सिनेमाचं प्रमोशन जोरात सुरू असून असाच एक प्रमोशन फंडा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) मेट्रोत डान्स करताना दिसत आहे.

पुण्यातील मेट्रोमधील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत 'चंद्रा' गाण्यावर अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) थिरकताना दिसतेय. मुख्य म्हणजे अभिनेत्रीसोबत बरीच लहान मुलं देखील या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' (Chandramukhi) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अवघ्या काही वेळातच या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) चंद्रा या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, खा.दौलतराव यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहेत. या कलाकारंसोबतच या सिनेमात मृन्मयी देशपांडे देखील एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे.

या सिनेमातील गाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. तसेच अनेकजण या सिनेमातील चंद्रा या गाण्यावर रिल्स बनवताना दिसत आहेत. चंद्रा हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या सिनेमाला अजय-अतूल यांनी संगीत दिले आहे. हा सिनेमा येत्या २९ एप्रिलला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा