मनोरंजन

Amruta Khanvilkar News Home: अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती, व्हिडिओ शेअर करतं दाखवली घराची पहिली झलक

अमृता खानविलकर ही तिच्या अभिनयासोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. अमृतासाठी ही दिवाळी काहीशी खास ठरली आहे. या दिवाळीला अमृताने तिची स्वप्नपूर्ती केली आहे.

Published by : Team Lokshahi

अमृता खानविलकर ही तिच्या अभिनयासोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. अमृतासाठी ही दिवाळी काहीशी खास ठरली आहे. या दिवाळीला अमृताने तिची स्वप्नपूर्ती केली आहे. अमृताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने नुकतीच तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. हे घर टोलेजंग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर असून तिने तिच्या घराला एकम "EKAM" असे ठेवले आहे..

EKAM म्हणजे सुरुवात आणि ती खऱ्या अर्थाने लवकरच येणार आहे असं अमृताने तिच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे. दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर अमृताने तिच्या नव्या घराची बातमी सांगितली आहे. तिच्या या स्वप्नपूर्तीवर अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छा आणि कौतुकांचा वर्षाव केला आहे

यावर तिने कॅप्शन देत लिहलं आहे की, चला भेट झालीच आपली कधी काळी दूर कुठेतरी तुझं स्वप्न पाहिलं होतं, आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न रोज सुरू होता.तर हि आपली पहिली दिवाळी. तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत, मला काय आवडतं, काय नाही, मनातलं गुपित, शांततेतलं सारं काही हळूहळू तुला कळेलच तुलाही मला खूप काही सांगायचं असेल माझी पूर्ण तयारी आहे. तू अजून हळूहळू आकार घेतोयस, तुझ्या कानाकोपऱ्यात मी माझं सगळं जग बसवायचा प्रयत्न करतेय. तू हि अगदी माझ्या हो ला हो म्हणतोयस. आवडतंय मला लवकरच भेटू नव्या कोऱ्या भिंतींसह नव्या आठवणी बनवण्यासाठी नवं आयुष्य उलगडण्यासाठी- Happy Diwali

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी