मनोरंजन

Radhika and Anant Wedding Invitation: अमृता खानविलकरला अंबानीच्या लग्नाचं खास निमंत्रण!

या लग्न सोहळ्यात येणार असल्याचा बातम्या असताना आता आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला देखील या लग्न सोहळ्याचं खास निमंत्रण आलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

हिंदी-मराठी इंडस्ट्रीत जोरदार चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. 2024 वर्षात अमृता अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट्समधून दिसणार असून आगामी वर्षात ती अनेक नवनवीन भूमिका साकारणार आहे. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अंबानी यांच्या लग्न सराईची अशातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिला अंबानी कुटुंबाकडून या लग्नसोहळ्याचं विशेष निमंत्रण देखील आल्याचं कळत आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार या लग्न सोहळ्यात येणार असल्याचा बातम्या असताना आता आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला देखील या लग्न सोहळ्याचं खास निमंत्रण आलं आहे.

अमृता तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आता ती या लग्न सोहळ्यात सहभागी होणार का? ही उत्सुकता सगळ्यांना आहे. राधिका आणि अनंत अंबानी यांचा लग्न सोहळा 12 ते 15 जुलै रोजी संपन्न होणार असून अनेक बडे कलाकार सुद्धा याला उपस्थित राहणार आहेत.

राधिका आणि अनंत अंबानी यांच्या बिग फॅट वेडिंगच्या चर्चा सगळीकडे सुरू असून अमृता खानविलकर देखील या लग्नाचा भाग होणार आहे. या लग्नासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, बिझनेसमेन आणि राज्यातील काही महत्वाचे राजकीय मंडळीही यावेळी उपस्थित राहणार आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा