Hruta Durgule Team Lokshahi
मनोरंजन

Ananya :'देव कधीच चुकत नसतो...'; हृताच्या बहुचर्चित 'अनन्या'चा टीझर प्रदर्शित

हृता लवकरच 'अनन्या' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

Published by : shweta walge

'दुर्वा', 'फुलपाखरु' या प्रसिध्द मालिकेतून प्रत्येकाच्या मनात घर करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). तिच्या उत्तम अभिनयामुळे आणि सौंदर्याच्या जोरावर हृता महाराष्ट्राची क्रश झाली. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केल्यानंतर हृता लवकरच 'अनन्या ’ (Ananya) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत या चित्रपटाचा टीझर (Teaser) नुकताच प्रदर्शित झाला आहे.

हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर तिच्या आगामी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. देव कधीही चुकत नसतो, तो जादू करतो...पहा आनंदी अनन्याचा हॅपनिंग टीझर". असं कॅप्शन देत हृताने हा टीझर शेअर केला आहे.

'अनन्या' या चित्रपटात हृताने अनन्या देशमुख ही भूमिका साकारली आहे. तर 'अनन्या' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड (Pratap Kad) यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अनन्याचा जिद्दीचा प्रवास या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'अनन्या' सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणते,"आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा सिनेमा आहे".

दरम्यान, येत्या २२ जुलै रोजी अनन्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतासोबत मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा