मनोरंजन

अनन्या पांडे होणार मावशी; अलानाने व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये लग्न झालेल्या अलाना पांडे व आयव्हर मॅकक्रे यांनी चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये लग्न झालेल्या अलाना पांडे व आयव्हर मॅकक्रे यांनी चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. लवकरच दोघे आई-बाबा होणार आहेत. म्हणजेच अभिनेत्री अनन्या पांडे मावशी होणार आहे. अनन्याच्या बहिणीने अलानाने इंस्टाग्रामवर तिच्या मॅटर्निटी शूटचा व्हिडीओ पोस्ट केला.

अनन्या पांडेची चुलत बहीण अलानाने बॉयफ्रेंड आयवर मॅक्रेसोबत 16 मार्च 2023 ला लग्न केले. नुकताच अलानाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अलानाने लिहिले की, “आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आम्ही तुला भेटण्यासाठी थांबू शकत नाही”, या पोस्टला उत्तर देत तिच्या नवऱ्याने लिहिले, “मी माझ्या बाळाला भेटण्यासाठी थांबू शकत नाही, मी तुझ्यावर प्रेम करतो”, असं म्हटलं. अनुषा दांडेकर व तानिया श्रॉफ यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले.

या व्हिडीओमध्ये अलाना व आयव्हर पोज देताना दिसले आहेत. दोघांनी बेबी बंपसह क्यूट पोज दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये हे जोडपे एकमेकांकडे पाहून हसतानाही दिसत आहे. अलानाने तिच्या सोनोग्रामची झलकही दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये, अलानाने फ्लोरल स्ट्रिंग ड्रेस घातला होता तर आयव्हर पांढरा शर्ट व ट्राउझर्समध्ये खूप उठून दिसत होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा