Anil kapoor  
मनोरंजन

अनिल कपूर व हर्षवर्धन या बापलेकाच्या जोडीचा सिनेमाचा ट्रेलर रिलीज...

Published by : Saurabh Gondhali

अनिल कपूर (Anil Kapoor) चा मुलगा हर्षवर्धन कपूर (Harshvardhan Kapoor) ने २०१६ साली 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तो आता नवीन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे थार (Thar Movie). या चित्रपटात बाप लेक एकत्र काम करताना दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दोघेही खूपच इंटरेस्टिंग दिसत आहेत.

ट्रेलरची सुरुवात एका ओसाड वाळवंटात अनिल कपूर आणि सतीश यांच्या खुनाच्या तपासापासून होते. काही वेळातच ट्रेलरमध्ये हर्षवर्धन या अँटीक व्यावसायिकाची एन्ट्री पाहायला मिळते. पण त्याच्या आगमनानंतर त्याच्या कथेत सस्पेन्स येतो. दुसरीकडे, फातिमा एका राजस्थानी मुलीच्या पात्रात दिसते, जी हर्षवर्धनच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. आता या प्रदेशाला हादरवून सोडणाऱ्या मृत्यूला जबाबदार कोण असेल हे पाहायचे आहे. ट्रेलरमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न दाखवण्यात आले आहेत, त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहेत.

थारचा ट्रेलर अनिल कपूरची मुलगी आणि हर्षवर्धनची बहीण सोनम कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करताना सोनम कपूर लिहिले, "... हा चित्रपट एखाद्या वाईट व्यक्तीबद्दल नाही. कदाचित या सगळ्यामागे कोणीतरी चांगली व्यक्ती आहे. किंवा कोणास ठाऊक? या घटनांमागे नायिका असेल? थार, ६ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. "

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा