मनोरंजन

'अ‍ॅनिमल'मधील अबरारच्या एंट्रीचे 'जमाल कुडू' फुल सॉन्ग रिलीज; तुम्ही पाहिले का?

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील बॉबी देओलने केवळ आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली नाहीत तर चित्रपटात दाखवलेली त्याची एंट्रीही सध्या चर्चेत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील बॉबी देओलने केवळ आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली नाहीत तर चित्रपटात दाखवलेली त्याची एंट्रीही सध्या चर्चेत आहे. वास्तविक, चित्रपटात अबरारची भूमिका साकारणारा बॉबी देओल 'जमाल कुडू' या गाण्यावर जबरदस्त डान्स मूव्हज करताना दिसत आहे. या स्टेप्स सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अशा स्थितीत चाहत्यांच्या प्रचंड मागणीवर निर्मात्यांनी आता हे पूर्ण गाणे रिलीज केले आहे.

बॉबी देओलचे एंट्री गाणे 'जमाल कुडू' हे इराणी ओरिजिन गाणे आहे. बॉबी देओलनेच या गाण्यावर त्याची एंट्री कोरिओग्राफ केली आहे. अभिनेत्याची ही जबरदस्त एंट्री पाहून आता लोकांना त्याचे वेड लागले आहे. चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची एवढी क्रेझ पाहून आता निर्मात्यांनी ते पूर्ण गाणे रिलीज केले आहे. हे गाणे यूट्यूबवर रिलीज होताच व्हायरल झाले आहे.

या गाण्याला अवघ्या एका तासात 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच यावर कमेंट करताना यूजर्स बॉबीचे कौतुक करताना थकत नाहीत. बॉबी देओलचे हे एंट्री गाणे संगीतकार हर्षवर्धन रामेश्वर यांनी तयार केले आहे.

दरम्यान, 'अ‍ॅनिमल' चित्रपटात बॉबी देओलने एका मुक्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय रणबीर कपूरही दिसत आहे. याशिवाय चित्रपटातील रश्मिका मंदान्नाचा अभिनयही लोकांना आवडला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."