मनोरंजन

Animal Trailer out: दमदार, धडाकेबाज, अंगावर शहारे आणणारा अ‍ॅनिमल'चा ट्रेलर रिलीज

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त 8 दिवस उरले आहेत. अशात चाहतेही या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाचा मोस्ट अवेटेड ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज म्हणजेच 23 नोव्हेंबरला धमाकेदारपणे रिलीज करण्यात आला. चित्रपटाचा ट्रेलर इतका अप्रतिम आहे की रिलीज झाल्यानंतर काही मिनिटांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. क्राईम थ्रिलरची एक झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे.

रणबीरच्या अॅनिमल या चित्रपटामधून प्रेक्षकांना अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्सचा मसाला मिळणार आहे. ट्रेलरची सुरुवात अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांच्या एका सीननं होते. या सीनमध्ये रणबीर आणि अनिल यांचा जबरदस्त अभिनय बघायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की अनिल कपूर हे रणबीरचे वडिल आहेत आणि वडिलांसाठी रणबीर काहीही करायला तयार असतो.

संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या ट्रेलर रिलीजपूर्वी, सप्टेंबरमध्ये रणबीर कपूरच्या वाढदिवसाला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.

हा क्राईम थ्रिलर चित्रपट पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित आहे. नुकतीच या चित्रपटाची अनेक गाणी रिलीज झाली आहेत, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्यामध्ये 'हुआ मैं', 'सतरंगा' आणि 'पापा मेरी जान' या गाण्यांचा समावेश आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे झाल्यास, रणबीर आणि रश्मिका स्टारर चित्रपट 'अॅनिमल' 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा