मनोरंजन

Ankita Lokhande: अंकिता लोखंडे होणार आई? "हा" व्हिडियो होतोय चर्चेचं कारण...

अंकिता आणि विकीच्या लग्नाला 3 वर्ष पार पडली आहेत आणि तिच्या जवळच्या मित्राने ती प्रेग्नंट असल्याच सांगितलं आहे.

Published by : Team Lokshahi

हिंदी सीरियल "पवित्र रिश्तामधून" नावागाजात आलेली अंकिता लोखंडे ही अनेक यानंतर घराघरांत पोहचली. या मालिकेतून जरी तिला ओळख मिळाली असेल तरी तिने तिचा चाहतावर्ग हा टिकवून ठेवला आहे. पवित्र रिश्ता या मालिकेनंतर ति आणि सुशांत सिंग रजपुत या अभिनेत्यासोबत चर्चेत आली. यानंतर काही कालांतराने या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर ती उद्योगपती विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. अंकिताने मालिकांसोबतच अनेक चित्रपटातही काम केलं आहे आणि ती सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे त्यामुळे तिचा चाहतावर्ग हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

अंकिता आणि विकी हे जोडप बिग बॉस 17 मध्ये पाहायला मिळाले होतं आणि त्यादरम्यान अंकिता ही फायनलचा टप्पा गाठूण आली होती. या शोदरम्यान या जोडप्यात अनेक वाद देखील पाहायला मिळाले. पण हा शो चालू असताना एक बातमी कानावर पडत होती ती म्हणजे, अंकिताच्या प्रेग्नंसीची. अंकिता आणि विकी हे शोमध्ये असताना अनेकदा अंकिताला तिच्या प्रेग्नंसीबद्दल विचारलं जात होत मात्र ती त्या प्रश्नांना टाळत असल्याचं पाहायला मिळायचं. अंकिता आणि विकीच्या लग्नाला 3 वर्ष पार पडली आहेत आणि तिच्या जवळच्या मित्राने ती प्रेग्नंट असल्याच सांगितलं आहे.

अंकिता आणि विकीने नुकताच कलर्स वाहिनीवर चालू असणारा कार्यक्रम 'लाफ्टर शेफ' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान तिचा मित्र अली गोनी याने ऑफ कॅमेरा शूट चालू असताना अंकिताच्या प्रेग्नंसीविषयी खुलासा केला होता. हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडियोमध्ये अली गोनी अंकिता आणि विकीची खिल्ली उडवत म्हणाला, छोटा जैन येणार आहे की, छोटी जैनी येणार आहे. अली गोनीचे हे बोलणं ऐकून अंकिता आणि विकी त्याचसोबत इतर टीम देखील हसताना दिसत होती. मात्र याबद्दल अंकिता आणि विकी या दोघांकडून अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही त्यामुळे अंकिता प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा विजय! ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर

Jacqueline Fernandez : दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला झटका; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील याचिका फेटाळली

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर