मनोरंजन

परिणीतीसोबत सुशांतचा किसिंग सीन पाहून रडली होती अंकिता

अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस १७ मध्ये पती विकी जैनसोबत सहभागी झाली आहे. 'बिग बॉस १७' शोच्या पहिल्याच दिवसापासून अंकिता विकी जैन आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यामुळे चर्चेत आहे.

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस १७ मध्ये पती विकी जैनसोबत सहभागी झाली आहे. 'बिग बॉस १७' शोच्या पहिल्याच दिवसापासून अंकिता विकी जैन आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यामुळे चर्चेत आहे.

नुकताच अंकिताने सुशांतसोबतचा एक किस्सा एका कार्यक्रमात सांगितला. या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या खूप व्हायरल होत आहे. या शोमध्ये अंकिता, अभिषेक कुमार, आयशा खान आणि अनुराग डोभाल यांना सुशांतसोबतच्या आठवणी सांगताना दिसत आहे. अंकिता म्हणाली, ‘जेव्हा सुशांतचा शुद्ध देसी रोमान्स चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा आम्ही दोघे एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सुशांतने पूर्ण यशराज हॉल बूक केला होता. तेव्हा पूर्ण चित्रपटगृहात फक्त आम्ही दोघेच होतो. कारण त्याला माहित होते, हा चित्रपट पाहिल्यावर मला खूप राग येईल म्हणून. मी पूर्ण चित्रपट पाहिला आणि सुशांतदेखील तेथून पळून गेला होता'.

'सुशांतने परिणीतीसोबत दिलेल्या किसिंग सीनमुळे मी घरी गेल्यावर खूप रडले. तेव्हा सुशांतदेखील माझ्यासोबत रडला. मला माफ कर अंकू, इथून पुढे असे कधीही करणार नाही' असे अंकिता म्हणाली. 'आपल्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पाहणे अवघड असते. पण आपण कोणाच्या करिअरमध्ये अडचणी नाही आणू शकत. पीके चित्रपटात सुशांतने अनुष्का शर्माला किस केल्याचे पाहून मला चक्कर आली होती. इतकंच नाही तर, धोनी चित्रपटापर्यंत सुशांत आणि मी एकत्र होते', असे अंकिता म्हणाली.

'पवित्र रिश्ता' मालिकेच्या सेटवर अंकिता आणि सुशांतची ओळख झाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरले होते. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी खूप डोक्यावर घेतले. पण दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा