मनोरंजन

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन कोण आहे? जाणून घ्या मालमत्तेसह कार कलेक्शनची माहिती

Published by : Lokshahi News

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी 14 डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारा समक्ष रेशीमगाठ बांधली. अंकिताने लग्नातील प्रत्येक विधी आणि खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. अंकिता आणि विकी तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अंकिता आणि विकीचं नातं नेहमीच चर्चेत राहिलंय.

विकी जैन मूळचा छत्तीसगडचा राहणारा असल्यामुळे अंकिता आता छत्तीसगडची सून झाली आहे. विकी एक उद्योगपती आहे. विकी बिलासपूरच्या एका प्रसिद्ध कोळसा व्यापाऱ्याचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकीचे आईवडील विनोद कुमार आणि रंजना जैन दोघेही व्यावसायिक आहेत.
एमबीए पूर्ण केल्यानंतर विकीने पूर्णपणे कौटुंबिक व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. सध्या तो महावीर इंस्पायर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. हा ग्रुप कोळसा, वॉशरी, लॉजिस्टिक, पॉवर प्लांट, रिअल इस्टेट आणि डायमंडचा व्यापारी आहे.

अंकिता लोखंडेच्या पतीनेही मुंबईतही 8BHK अपार्टमेंट घेतला आहे, जिथे हे जोडपे लवकरच शिफ्ट होणार आहेत. विकीकडे 'लँड क्रूझर' आणि 'मर्सिडीज-बेंझ' कारचे कलेक्शन आहे.विकी स्वतः देखील एक व्यावसायिक आहे आणि याच अनुषंगाने तो मुंबईत ये-जा करत असतो. दरम्यान, मित्राच्या माध्यमातून त्याची अंकिता लोखंडेसोबत गाठ पडली. आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. तब्बल ३ वर्षांनी दोघांचे लग्न झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौदावी सुनावणी

Pune Bhide Bridge : पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

iPhone 17 : Apple ने नव्या फीचर्ससह लाँच केला आयफोन 17

Accident : अटल सेतूवर भीषण अपघात; एका व्यक्तीचा जागीच मृत्यू