ankita walavarkar getting marry with kunal bhagat 
मनोरंजन

Kokan Hearted Girl ने अखेर होणाऱ्या पतीसोबत फोटो केला शेअर

‘कोकण हार्टेड गर्ल’ने अंकित वालावरकर ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यावर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचं देखील तिने घरात सांगितलं होतं. अंकिताने बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर १२ ऑक्टोबरला होणाऱ्या पतीबद्दल माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर आज १२ ऑक्टोबर रोजी तिने तिच्या होणाऱ्या पतीचं नाव जाहीर केलं आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉस मराठी ५ फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तिने तिचे लग्नाचे प्लॅन्स सांगितले होते. घरातही अनेकदा तिने ‘कोकण हार्टेड बॉय’चा उल्लेख केला होता, त्यामुळे तिचा होणारा पती नेमका कोण? याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. अखेर अंकिताने होणाऱ्या पतीबरोबरचा फोटो शेअर करत तो कोण आहे हे सांगितलं आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ने अंकित वालावरकर ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यावर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचं देखील तिने घरात सांगितलं होतं. अंकिताने बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर १२ ऑक्टोबरला होणाऱ्या पतीबद्दल माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर आज १२ ऑक्टोबर रोजी तिने तिच्या होणाऱ्या पतीचं नाव जाहीर केलं आहे. अंकिताने त्याच्याबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर करत सूर जुळले असं म्हटंल आहे. अंकिता वालावलकरच्या होणाऱ्या पतीचे नाव कुणाल भगत आहे. ‘सूर जुळले…’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला.

कुणाल हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. आतापर्यंत कुणालने अनेक मालिका व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. अंकिता आणि कुणालने ‘आनंदवारी’ या गाण्यात एकत्र काम केले होते.

अंकिता- कुणाल लग्न केव्हा करणार?

अंकिताने काही दिवसांपूर्वी मुलाखतीत सांगितलं की ती फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहे. अंकिता व कुणालचं लग्न कोकणात होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिच्या गावीच अंकिता लग्नबंधनात अडकणार आहे.

दरम्यान, अंकिताच्या बिग बॉसमधील प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास ती ७० दिवस या शोचा भाग होती. ती यो शोच्या टॉप ५ सदस्यांपैकी एक होती. ती पाचव्या क्रमांकावर घरातून बाहेर पडली होती. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर अंकिताला कुणालने एक सुंदर सरप्राईज दिलं होतं. अंकितासाठी भव्य सजावट करून मध्यभागी ‘Winner’ असं लिहिण्यात आलं होतं. पांढऱ्या-लाल रंगाचे फुगे, औक्षण, फुलांची सजावट, केक ही सगळी तयारी खास ‘कोकण हार्टेड बॉय’ने केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?