मनोरंजन

11 वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश ,स्वप्नील आणि सईची मैत्री झळकणार मोठ्या पडद्यावर

अंकुश चौधरी ,स्वप्नील जाधव आणि सई ताम्हणकर यांची मैत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अंकुश चौधरी ,स्वप्नील जाधव आणि सई ताम्हणकर यांची मैत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ए.वी.के पिक्चरस्, व्हिडीओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्त्यात असल्या तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजली असेल आणि धडधड पण नक्कीच झाली असेल. अशीच काहीशी उत्सुकता आता वाढणार आहे. ही टीम आता पुन्हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे.

चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही टीम प्रेक्षकांना ११ वर्षांनंतर भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर या सिनेमाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत.

या चित्रपटाबाबत अमेय खोपकर म्हणतात, " संजय जाधव यांचासारखा धमाकेदार दिग्दर्शक यांच्यासोबत येरे येरे पैसा, येरे येरे पैसा 3, कलावती हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!"

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक