मनोरंजन

'सुंदरी' मालिका पुन्हा एकदा रोमांचक वळणावर; मालिकेतून साहेब उर्फ वनिता खरात घेणार प्रेक्षकांचा निरोप

साहेब हे पात्रं प्रेक्षकांचा निरोप घेणार असून मालिकेत रोमांचक असे सीन्स पाहायला मिळणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

आई आणि मुलीचं नातं हे जगावेगळं असतं. आईसोबत रक्ताचंच नातं असलं की त्यांच्या भावना खऱ्या असतात किंवा तेव्हाचं ते नातं टिकतं असं नसून आई या नात्याने आपुलकीने सांभाळ करणारी एखादी स्त्री पण खऱ्या आई इतकाच जीव बाळाला लावू शकते हा विचार 'सन नेटवर्क'च्या 'सन मराठी' वाहिनीवरील 'सुंदरी' या मालिकेतून मांडला गेला आहे.

सावी ही जरी अनू आणि आदित्यची मुलगी असली तरी सुंदरीने सावीला आईचं प्रेम, आईची माया दिली आहे. त्यामुळे सुंदरी आणि सावी मधलं आई मुलीचं नातं हे दिवसेंदिवस फुलत चाललेलं प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. 'सुंदरी' मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवलं जाईल अशा घटना घडताना दाखवल्या आहेत.

आता 'सुंदरी' ही मालिका पुन्हा एकदा नव्या वळणावर पोहचणार आहे. काही महिन्यांपूर्वी 'साहेब' या खलनायिकेची एंट्री मालिकेत झाली होती जी भूमिका अभिनेत्री वनिता खरात साकारत होती. आता साहेब हे पात्रं प्रेक्षकांचा निरोप घेणार असून मालिकेत रोमांचक असे सीन्स पाहायला मिळणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा