मनोरंजन

Anupam Kher: अनुपम खेर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; राहत्या घरासह कार विकण्याची आली होती वेळ

अनुपम खेर हे बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला ज्यात त्यांच्यावर आलेल्या त्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितल आहे ज्यात ते अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली होती.

Published by : Team Lokshahi

अनुपम खेर हे बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक पात्र पार पाडली. त्यांच्या अभिनयाने त्यांचा एक वेगळा आणि मोठा चाहतावर्ग पाहायला मिळतो. त्यांना विनोदी पात्रासाठी आणि नकारात्म पात्रासाठी मोठ्या प्रमाणात ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. त्यांच्या विनोदी पात्रा बद्दल आज ही चर्चा होताना दिसून येते. अनुपम खेर यांनी 2002 मध्ये आलेल्या ओम जय जगदीश या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. अनुपम खेर हे यशराज प्रोडक्शनच्या "विजय 69" या चित्रपटात दिसणार असून हा चित्रपट 8 नोव्हेंबर 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

अशातच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला ज्यात त्यांच्यावर आलेल्या त्या एका परिस्थिती बद्दल त्यांनी सांगितल आहे ज्यात त्यांची आर्थिक परिस्थिती अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली होती. अनुपम खेर हे श्रीमंत आणि यशस्वी चित्रपटांवर काम करत असले तरी ते त्यांच्या करिअरमध्ये अनेक आव्हानांना सामोरे गेले आहेत.

ही वेळ त्यांच्यावर 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस आली होती. ते मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते आणि त्यांची कार चोरीला गेली. त्यानंतर त्यांनी त्याची तक्रार देण्यासाठी जेव्हा ते जवळच्या पोलिस ठाण्यात गेले त्यावेळी ही एखाद्या चित्रपटाची गोष्ट असू शकते असा विचार करुन त्याठिकाणी सर्व पोलिस कर्मचारी हासायला लागले. अभिनेत्याने सांगितले यानंतर त्यांचा कठीण काळ आणखी वाईट झाला. यानंतर अनुपम खेर यांनी सांगितले, टीव्ही टायकून या त्यांच्या व्यवसायासाठी त्यांनी सर्व काही गमावले होते. या व्यवसायासाठी ते त्यांचे घर आणि ऑफिस दोन्ही विकायच्या वाटेवर आले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात