Anupam Kher
Anupam Kher Team Lokshahi
मनोरंजन

Anupam Kher : चिमुकलीने दिलं अनुपम यांच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर...

Published by : prashantpawar1

बॉलिवूड (Bollywood) अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. खेर अनेकदा सामाजिक आणि राजकीय विषयांवरही मोकळेपणाने आपले मत मांडताना दिसतात. या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणतात. अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर (अनुपम खेर इन्स्टाग्राम) असा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी देखील दिसत आहे. अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कलाकार लहान मुलांसाठी चॉकलेट घेऊन कोणाच्यातरी घरी जाताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये खेर चिमुरडीला तिचे नाव विचारतात. खेर पुढे त्या मुलीला विचारतात की हे चॉकलेट कुणाकडून मिळाले. यावर मुलगी म्हणते- 'तुम्ही''. यानंतर अनुपम खेर जेव्हा विचारतात की 'मी चांगला अंकल आहे ना?' तर चिमुरडी 'मला माहीत नाही' असे उत्तर देते. हे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसू लागले. अनुपम खेर पंजाबीत म्हणतात 'ले करदी ना कच्ची.'

Anupam kher

अनुपम खेर सध्या त्यांच्या आगामी 'द सिग्नेचर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा त्यांचा ५२५ वा चित्रपट असल्याचे स्वत: अनुपम यांनी सांगितले आहे. हा चित्रपट एका सामान्य माणसाचं कथानक असणार आहे. गजेंद्र अहिरे (Gajendra Ahire) या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात महिमा चौधरी (Mahima Chaudhari) ही देखील आहे. जी आता कॅन्सरच्या आजारातून बरी होऊन अभिनयात परतत आहे. तिच्या लढाईची आणि कॅन्सरपासून बरी झाल्याची बातमी तेव्हा आली जेव्हा अनुपमने तिच्यासोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये महिमाने सांगितले होते की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती तेव्हा अनुपमने तिला तिच्या चित्रपटासाठी बोलावले होते.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...