Anupam Kher Team Lokshahi
मनोरंजन

अनुपम खेर यांनी फिटनेस प्रवास मांडला 'कू' वर

Published by : Team Lokshahi

अनुपम खेर (Anupam Kher)म्हणजे उत्स्फूर्त अभिनय, विनोदाचे अफलातून टायमिंग आणि वैविध्यपूर्ण भूमिकांनी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारे नाव. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या खेर यांची 'कू' वरची एक पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. (koo)

खेर सोशल मीडियावरही (social media)नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे टाकत असतात. जगण्याच्या विविध पैलुंवर, तत्वज्ञानावर भाष्य करणारे विविध सुविचारही ते टाकत असतात. आज खेर यांच्या वैयक्तिक आयुष्यातली एक कमालीची प्रेरक गोष्ट समोर आली आहे.

काही काळापूर्वीच खेर यांनी एक घोषणा केली होती. ती होती वैयक्तिक आयुष्यातील फिटनेस गोलबाबत. आज खेर यांनी काही काळापूर्वीचा आणि आताचा फोटो टाकून आपल्या फिटनेसचा लक्षवेधी प्रवास शेअर केला आहे.

पोस्ट करताना खेर लिहितात, "तुमची बदलण्याची इच्छा आता जसे आहात तसे राहण्याच्या इच्छेहून मोठी असली पाहिजे. जिममध्ये (gymnasium)जाऊन वजन उचलण्याने तुमचा फिटनेसचा प्रवास सुरू होत नाही. तो सुरू होतो तुमच्या डोक्यात. आजचा दिवस निर्धार करण्यासाठी अतिशय योग्य आहे." सोबत खेर यांनी #KuchBhiHoSaktaHai #YearOfTheBody #MondayMotivation असे हॅशटॅग्जही वापरले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा