Anushka Sharma
Anushka Sharma  Team Lokshahi
मनोरंजन

Anushka Sharma : बिस्किटची चुकीची स्पेलिंग लिहिण्यावरुन झाली ट्रोल

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यातच अनुष्का शर्माची एक इंन्स्टा स्टोरी चर्चेचा विषय ठरला आहे. पोस्टमध्ये अनुष्का शर्माने बिस्किटचा फिडबॅक दिला आहे. असे म्हणता येईल की, अभिनेत्रीला बिस्किटे इतकी आवडली की ती त्यांना रिव्ह्यू दिल्याशिवाय राहू शकली नाही. पण यादरम्यान अनुष्काने अशी चूक केली, ज्यामुळे ती ट्रोलिंगची शिकार झाली. यानंतर अभिनेत्रीने माफी मागितली आहे.

वास्तविक, अनुष्का शर्माने प्रथम तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक नोट शेअर केली, ज्यामध्ये तिने सांगितले की ती बिस्किटचा फिडबॅक घेणार आहे. यानंतर तीने एकामागून एक अनेक सामान्य बिस्किटांचे फोटो शेअर केले. यासोबतच अनुष्काने तिला कोणते बिस्किट आवडले आणि कोणते नाही हे देखील सांगितले. अनुष्काने अनेक बिस्किटांना पाचपैकी फक्त दोन नंबर दिले आहेत, तर काहींना तीन नंबरही दिले आहेत. पण यादरम्यान, अभिनेत्रीने एका ठिकाणी बिस्किटचे स्पेलिंग चुकीचे लिहिले, त्यानंतर लोकांनी तिला खूप ट्रोल केले.

अनुष्काने तिच्या स्टोरीत बिस्किटचे स्पेलिंग चुकीचे लिहिताच. लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली, त्यानंतर अभिनेत्रीने लगेचच लोकांची माफी मागितली आणि पुढे जाण्याचा सल्ला दिला. अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'माझ्या चुकीच्या स्पेलिंगमुळे कोणी नाराज झाले असेल, तर मी त्या सर्व लोकांची माफी मागू इच्छिते, कृपया पुढे जा.' अनुष्काने लगेच ही पोस्ट केली.

'चकडा एक्स्प्रेस' या चित्रपटात क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या कर्तृत्वासोबतच क्रिकेटच्या प्रवासातील त्यांचा वैयक्तिक ते शैक्षणिक संघर्षही दाखवण्यात येणार आहे. अनुष्का शर्मानेही झुलन गोस्वामीच्या भूमिकेत स्वत:ला सामावून घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाद्वारे अनुष्का बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतत आहे. अनुष्का अखेरची 2018 मध्ये 'झिरो'मध्ये अभिनेता शाहरुख खानसोबत दिसली होती.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका