Anshuman Vichare,Pallavi Vichare Team lokshahi
मनोरंजन

एप्रिलफूलचा विनोद आला अंगाशी, अंशुमन विचारेची पत्नीने व्हिडिओ शेअर करत सांगितले...

अभिनेता अंशुमन विचारेची पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल

Published by : Team Lokshahi

अभिनेता अंशुमन विचारे (Anshuman Vichare) याची पत्नी पल्लवी विचारेने (Pallavi Vichare) पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी good news दिली. अंशुमनच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) ही पोस्ट शेअर करत एक लिंकसुध्दा दिली होती. यात त्याची लेक अन्वीनं (Anvi) बाळाला मांडीवर घेतल्याचं दिसत होतं. त्यानंतर त्याला मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर त्याला मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि अंशुममला त्याचे चाहत्ये शुभेच्छा देत आहेत आणि ते अजूनही सुरुच आहे. आता अंशुमनची पत्नी पल्लीवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पल्लीवीने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले, “१ एप्रिलला मी गंमत म्हणून एक व्हिडिओ शेअर केला होता. अन्वीला भाऊ झाला आहे असं सांगितलं. मात्र यानंतर अंशूला मेसेज, फोन आले. आम्ही अंशुला सांगितलं होतं की, हे एप्रिल फूल आहे म्हणून सांग. यानंतर अंशुमनला खूप कॉल, मेसेज आले त्याचा त्याला खूप त्रास होतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की, हे सगळं थांबवा. आम्हाला एकच मुलगी आहे. त्यामुळे हे सगळं थांबवण्याची विनंती पल्लवीने या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा