अरबाज खानने गर्लफ्रेंड शुरा खानसोबत बांधली लग्नगाठ बांधली आहे. मलायकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याने 6 वर्षांनंतर गर्लफ्रेंड शुरा खानसोबत लग्न केलं आहे. अरबाज आणि शुरा यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अर्पिताच्या घरी अरबाज आणि शुरा यांचा निकाह झाल्याची माहिती मिळत आहे. अरबाज खानने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. काही दिवसांपूर्वीच जॉर्जियासोबत त्याचा ब्रेकअप झाला.
अरबाज आणि शुरा यांच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 2017 मध्ये मलायका आणि अरबाज यांची घसस्फोट झाला.