मनोरंजन

Art director Raju Sapte | व्हिडीओ रेकॉर्ड करून कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

Published by : Lokshahi News

चंद्रशेखर भांगे | मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक राजू सापते (Raju Sapte)यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत त्यांनी लेबर युनियनचा राकेश मौर्य पदाधिकारी आपल्या त्रास देत असल्याच राजु सापते (Raju Sapte)सांगतांना दिसत आहेत. यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक राजेश मारुती सापते (Raju Sapte)हे मुंबईमध्ये राहण्यास असून त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बनवलेल्या व्हिडीओमध्ये राकेश मोरया लेबर युनियन हे खूप त्रास देत असल्याच म्हटलं आहे. तसेच त्यांचे कोणतेही पेमेंट बाकी नसल्याचं देखील त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. त्यांचे एकूण पाच प्रोजेक्ट सुरू होते. परंतु, राकेश मोरया लेबर युनियन त्यांना काम करू देत नसल्याने काही प्रोजेक्ट सोडावे लागले आहेत, असं देखील त्यांनी यात म्हटलं आहे.

राजू सापते (Raju Sapte)यांच्या आत्महत्ये प्रकरणी वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे. लेबर युनियनच्या पदाधिकारी राकेश मोर्या यांच्या जाचाला कंटाळूनच माझ्या पतीने आत्महत्याग्रस्त करण्याचा पाउल उचलला, त्यामुळे राकेश मोर्या याला कठोर शासन होऊन माझ्या पतीला न्याय मिळायला हवं अशी मागणी राजू सापते (Raju Sapte)यांची पत्नी सोनाली सापते यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा