मनोरंजन

कोर्टाच्या अटीनुसार आर्यन खान NCB कार्यालयात हजर

Published by : Lokshahi News

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अडकलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने आज दुपारी नोर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागीय कार्यालयात हजेरी लावली. यावेळी बॉडीगार्ड रवी सिंह त्याच्यासोबत होता.

आर्यनची ३० ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका झाली होती. मुंबई हायकोर्टाने काही अटी घालत त्याला जामीन मंजूर केला होता. ३ ऑक्टोबर रोजी अटक झाल्यानंतर २७ दिवस त्याला कोठडीत काढावे लागले होते. दरम्यान, आर्यनने कोठडीतून सुटका झाल्यानंतर आज प्रथमच एनसीबी कार्यालयात हजेरी लावली.

मुंबई हायकोर्टाने जामीन देताना आर्यनला अनेक अटी घातल्या आहेत. त्यात जामिनावर असताना दर शुक्रवारी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी २ यादरम्यान एनसीबीच्या मुंबई विभागीय कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश त्याला कोर्टाने दिलेले आहेत. त्या अटीचे पालन करत आर्यन आज दुपारी एनसीबी कार्यालयात पोहचला. आर्यनसोबत त्याचा बॉडीगार्ड रवी सिंह वगळता अन्य कुणीही नव्हतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा