बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरो आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. सुनील शेट्टीने जीव धोक्यात घालून अनेक मुलींचे प्राण वाचवले होते. अलीकडे कोणत्याही चांगल्या कामाची स्तुती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अनेक वर्षांपासून सुनील शेट्टीच्या या कामाची माहिती कोणालाच नव्हती. ही घटना 1996 मध्ये घडली होती. सुनीलने 128 मुलींना मानवी तस्करीतून वाचवले.
मुंबईतील कामाठीपुरा परिसरात ५ फेब्रुवारी १९९६ रोजी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी छापा टाकला. त्यादरम्यान तेथून ४५६ मुलींची सुटका करण्यात आली. या सर्व मुली 14 ते 30 वयोगटातील होत्या. यातील 128 मुली नेपाळमधील होत्या. यापैकी निम्म्या अल्पवयीन मुली होत्या. पोलिसांनी या मुलींची कामाठीपुरा येथून सुटका केली. मात्र, नेपाळ सरकारने या मुलींना त्यांच्या देशात परत आणण्यास नकार दिला. या मुलींकडे जन्म प्रमाणपत्र किंवा नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नव्हता, असे नेपाळ सरकारचे म्हणणे होते. यानंतर सुनील शेट्टी त्या मुलींसाठी देवदूत बनून आला. त्यांनी या 128 मुलींना घरी पाठवण्याची व्यवस्था केली होती.
सुनील शेट्टीने या मुलींना काठमांडूला पाठवण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. यासोबतच सर्व मुली सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचतील याचीही खात्रीही त्याने केली. सुनीलने या मदतीबाबत कधीही भाष्य केले नाही, कारण ही घटना कुठेतरी वाचली तर मुलींसाठी धोका होऊ शकतो, अशी भीती त्याला वाटत होती.
मात्र, या मुलींमधली वाचलेली चरिमाया तमांग हिने एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. सुनील शेट्टीने केलेले हे उदात्त काम चारिमयाच्या या मुलाखतीनंतर प्रकाशझोतात आले. चारिमया आता एक एनजीओ चालवते. यानंतर सुनील शेट्टीने तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजेच २०२० मध्ये या मदतीचा खुलासा केला.