मनोरंजन

Asha Bhosle Birthday : गानसम्राज्ञी आशा भोसलेंचा 90 वा वाढदिवस; हजारो गाण्यांना दिला आवाज

Published by : Team Lokshahi

Asha Bhosle Birthday: आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ ला महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये झाला. पंडित दिनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर हे त्यांचे आई वडील. तर लता मंगेशकर या त्यांची मोठी बहीण. उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि मीना खडीकर या भावंडांमध्ये आशाताई मोठ्या आहेत. दहाव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केलेल्या आशाबाईंनी आजवर १२ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मराठी आणि हिंदी गाण्यांचा एक काळ असा होता ज्या काळावर त्यांनी शब्दशः राज्य केलं आहे. आशा भोसले ९ वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचं सगळं कुटुंब मुंबईत आलं. आशा भोसलेंनी मग लतादीदींसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चित्रपटांमध्ये गाणी म्हणण्यास आणि अभिनय करण्यास सुरुवात केली.

‘माझा बाळ’ नावाच्या सिनेमात आशा भोसले पहिलं गाणं गायल्या होत्या. त्यानंतर आजवर शेकडो हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी त्यांनी गाणी म्हटली आहेत. लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका जेव्हा संगीत क्षेत्रावर राज्य करत होत्या त्या सगळ्यांमध्ये आशा भोसलेंनी आपली एक शैली निर्माण केली आणि या स्पर्धेत त्या प्रस्थापित गायिकांपेक्षा वेगळ्या आणि अष्टपैलू ठरल्या. भावगीत, शास्त्रीय संगीत यापासून ते अगदी उडत्या चालीचीही अनेक गाणी आशा भोसलेंनी लीलया गायली.

दुसरीकडे, आशा भोसलेही जेव्हा मोठ्या झाल्या, तेव्हा त्या आपल्याला घराची जबाबदारी घेण्यात हातभार लावतील असे लतादीदींना वाटले. पण आशा लहानपणापासूनच लहरी होत्या. त्यांना नियमांचे बंधन आवडत नव्हते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ३१ वर्षीय गणपतराव भोंसले यांच्याशी लग्न करून आशा यांनी लतादीदींना आश्चर्यचकित केले होते.

लहानपणापासूनच गाण्याची आवड - दीनानाथ मंगेशकर यांनी लहान वयातच आशा यांना शास्त्रीय संगीत शिकवलं. आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी संगीताच्या दुनियेत पाऊल ठेवलं. १९४३ मध्ये त्यांनी पहिलं मराठी गाणं गायलं होतं. चला चला नव बाळा' हे पहिलं मराठी गाणं आशा दीदींनी गायलं होतं. तर, १९४८ मध्ये आलेल्या 'चुनरिया' चित्रपटासाठी 'सावन आया' हे पहिलं हिंदी गाणं त्यांनी गायलं होतं.

गायली हजारो गाणी - संगीत कारकिर्दीत आशा भोसले यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्या जादूई आवाजानं एकापेक्षा एक गाणी सुपरहिट केली आहेत. आशा भोसले यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत १२ हजारांहून अधिक गाण्यांना आवाज दिलाय. आज आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या काही सुपरहिट गाण्यांबद्दल सांगणार आहोत......

1. कजरा मोहब्बत वाला - १९६८ मध्ये रिलीज झालेल्या 'किस्मत' चित्रपटातील हे गाणं इतकं सुपरहिट ठरलं की त्याचा रिमेक अनेकवेळा बनवण्यात आला. आशा भोसले आणि शमशाद बेगम यांच्या आवाजात अत्यंत सुरेख हे गाणं आहे.

2. झुमका गिरा रे - हे गाणं १९६६ मध्ये रिलीज झालेल्या 'मेरा साया' चित्रपटातील आहे. आशा भोसले यांच्या जादूई आवाजात गायलेले हे गाणं आहे. हे गाणं त्यावेळी सुपरहिट ठरलं होतं. आजही हे गाणं खूप आवडीनं चाहते ऐकतात.

3. पिया तू अब तो आजा - १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कारवां' चित्रपटातील हे गाणं अभिनेत्री हेलनवर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्यासाठी आशा भोसले यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कारही मिळाला होता. हे गामं आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे.

4. एक परदेसी मेरा दिल ले गया- १९५८ मध्ये रिलीज झालेल्या फागून चित्रपटातील हे गाणं खूप सुपरहिट झालं होतं. अनेकांनी या गाण्याचा रिमेक बनला आहे. हे गाणं मोहम्मद रफी यांनी आशा भोसले यांच्यासोबत गायलं होतं.

5. राधाला कैसे ना जले - २००० साली रिलीज झालेल्या आमिर खान स्टारर सुपरहिट चित्रपट 'लगान'मधील हे गाणं आशा भोसले यांनी उदित नारायणसोबत गायलं होतं. हे गाणं आजही ऐकले जाते.

6. किताबें बहुत सी पढ़ी होंगी - १९९३ मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर 'बाजीगर' चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती. आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजानं 'किताबों बहुत सी पढ़ी होगी हे गाणं गायिलं होतं.

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट